महाप्रसादाच्या कार्यक्रमाने काकडा आरती उत्सवाची सांगता जामाेदात 115 वर्षाची परंपरा अजूनही कायमच

महाप्रसादाच्या कार्यक्रमाने काकडा आरती उत्सवाची सांगता जामाेदात 115 वर्षाची परंपरा अजूनही कायमच

 


आकाश उमाळे /२० नोव्हेंबर २०२० /जामोद ता जळगाव जा


येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व ढोलाचे भजनी मंडळ व हातटाळाचे भजनी मंडळाचे वतीने याहीवर्षी कार्तिक स्नाना निमित्त दररोज सकाळी पाच वाजता श्रीराम मंदिरातून भजनी दिंडीसह नामस्मरणाच्या गजरात भजनी भक्ती गीते गात एक महिन्यापर्यंत नगर परिक्रमा करण्यात आली काकडा आरतीची गेल्या 115 वर्षां अगोदर पासूनची परंपरा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व ढोलाचे भजनी मंडळाकडून अद्यापही कायमच आहेत.



येथील श्रीराम मंदिरातून सकाळी पाच वाजता काकडा आरतीला सुरुवात करून गावातील सर्वच मंदिरांमध्ये भजनी दिंडी जाऊन मंदिरातील देवदेवतांची पूजा अर्चा करून भक्ती गीते व आरती गाऊन सदर भजनी दिंडी गावातील मुख्य मार्गावरून गाव परिक्रमा केल्यानंतर शेवटी श्रीराम मंदिरात काकडा आरतीची सांगता करण्यात येत होती सकाळीच भजनी दिंडीचे आगमनापूर्वी अनेक सुवासिनींनी आपल्या घरासमोरील अंगणात मुख्य रस्त्यांवर सुरेख रांगोळ्या काढून व भावपूर्वक भजनी दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले होते यानिमित्त भारतीय संस्कृतीमध्ये असलेले कार्तिक स्नानाचे महत्त्व जामोद नगरवासी पर्यंत पोहोचले असून सर्व जण या आनंदात सहभागी झाले होते दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक बारस या एक महिना चालणाऱ्या काकडा आरतीची महाप्रसादाच्या कार्यक्रमाने ढोलाचे भजनी मंडळाने सांगता केली तर श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे वतीने दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्वस्वी ढोलाचे भजनी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वस्वी पुंडलीकराव दामधर ,प्रल्हाद आप्पा जावळे ,मोतीराम धुर्डे, मारुती भोपळे ,नारायणराव दामधर, पांडुरंग केदार ,नारायण राऊत ,नारायण केदार ,शंकरराव ढगे ,विष्णु राऊत, गोविंदा भगत, पुंजाजी हिस्सल, पांडुरंग धुर्डे, शंकर खिरोडकार, मारुती धुर्डे, देविदास भगत, रामा ढगे, गजानन हांडे ,नामदेव धर्मे ,नीना ढगे, शामराव दातीर ,अनंता ताडे यांच्यासह इतरही ढोलाचे भजनी मंडळाचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *