जामोद सरपंच चे मुख्यमंत्री ना पत्र

*_जळगाव जा. येथे सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जामोद सरपंचा सौ. गंगुबाई दामधर यांचे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य यांना निवेदन सादर_*



*_आकाश उमाळे /15 एप्रिल_*



*_जामोद:-_*
जळगाव जामोद येथे सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आज दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जामोद येथील सरपंचा सौ गंगुबाई दामधर यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे पाठविलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की आजच्या कोरोना महामारी च्या कठीण काळात आम्ही सर्व आपणा सोबत आहोत व ही लढाई आपण जिंकणारच हा आम्हाला आत्मविश्वास आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये रब्बी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते लाँकडाऊन मुळे कांद्याचे भाव 2000 रुपये प्रति क्विंटल वरून पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल झालेले आहेत तसेच कांद्याला खरेदीसाठी खरेदीदार व्यापारी पण नाही आहेत यामुळे कांदा पडून आहे जर हा कांदा पुढील काही दिवसात विकल्या नाही गेला तर प्रचंड नुकसान होईल तरी मी आपणास सविनय विनंती करते कि जळगाव जामोद येथे सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरू करून कमीत कमी 1500 रुपये प्रति क्विंटल भावाने कांदा खरेदी करावा अशा बद्दलचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे जामोद येथील सरपंचा सौ गंगुबाई पुंडलीकराव दामधर यांनी मागणी केली आहे


आधिक माहिती साठी फोटो बघा..





वरील सर्व माहिती :: ग्रामपंचायत जामोद यांच्या कडून मिळाली.



.
.
.
.
.
.
.
.
.
सूचना :: जामोद वेबसाइट वर कोणती पण पोस्ट ही फक्त आणि फक्त जामोद च्या व तसेच परिसरातील लोकांना माहिती साठी व तसेच परिसरातील चांगल्या गोष्टीचा/माहितीचा संग्रह एकाच ठिकाणी मिळावा व पाहता यावा यासाठीच पोस्ट करत असतो यात जामोद डॉट इन वेबसाइट ची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे कुठलीच जबाबदारी नाही याची नोंद घ्यावी.
धन्यवाद !!!



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *