जामोदात भिषण पाणीटंचाई दोन अल्पभुधारक शेतकरी ठरले बळी


विहीरीतील घाण कचरा काढण्यासाठी विहरीत

उतरलेल्या दोघांचा विहरीत गुदमरुन मृत्यु


५ एप्रिल
*जामोद, ता. जळगाव जा. :

घराशेजारील जुन्या व ओसाड विहिरीत घाण कचरा काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना.

५ एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा पूर्वसंखेल्या जामोद येथे घडली.

वाघमारे कुटुंबीयांनी घराशेजारील पडीक जागेत ओसाड असलेल्या विहिरीत घाण काडी कचरा ४एप्रिल रोजी पेटवून दिला होता तर

५ एप्रिल रोजी विहिरीतील घाण कचरा घाण साफ करण्याचे उद्देश्याने विहिरीत दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान प्रथम प्रतीक वाघमारे वय २५ हा विहिरीत कचरा घाण काढण्यासाठी उतरला असता अचानक विहिरीत विषारी वायूमुळे जीव गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी

त्याचे काका विजय काशिनाथ वाघमारे वय ५२ वर्षे हे विहिरीत उतरले.

त्यांनी सुद्धा मला वाचवा, वाचवा विहिरीतून वर घ्या, असा आरडा-ओरदा केला असता त्यांना वाचविण्यासाठी मिलिंद मुरलीधर वाघमारे वय ३४ वर्ष हे सुद्धा विहिरीत उतरल्याने ते सुद्धा विहिरीत विषारी गॅस वायूंमुळे गुदमरून बेशुद्ध पडले.

सदर विहिरीतून प्रतीक वाघमारे वय २५ यास बाहेर काढण्यात अनंता धर्मे वय ३५ या युवकास यश आले.

परंतु विहिरीत विषारी वायूमुळे त्यांची सुद्धा तब्येत बिघडल्याने तत्काळ जळगाव जा. येथील डॉ. कपले यांचे दवाखान्यात त्याला भरती करण्यात आले.

या प्रकारात अल्पभूधारक शेतकरी मिलिंद मुरलीधर वाघमारे वय ३५ व

विजय काशिनाथ वाघमारे वय ५२ या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतक मिलिंद वाघमारे यांच्या पक्ष्यात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार असून

विजय वाघमारे यांचे मागे पत्नी, मुलगा मुलगी,

असा आप्त परिवार आहे घडलेल्या या घटनेमुळे जामोद गावभर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




*आकाश नामदेवराव उमाळे*
www.jamod.in

*५ एप्रिल २०१९*



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *