खतांचे वाढीव दर करणे बाबत जामोद सरपंचाचे पंतप्रधानांना पत्र

॥ श्री।। सौ.गंगुबाई पुंडलिकराव दामधर लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत जामोद निवास – मु.पो.जामोद ता.जळगांव (जामोद) जि. बुलडाणा संपर्क – 9970932315 प्रति, मा. ना. श्री. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान, भारत सरकार.



विषय – खतांचे वाढिव दर तात्काळ कमी करणे बाबत संदर्भ – प्रसार माध्यमातून १४ मे २०२१ ला खतांच्या दरवाढी बाबत प्रकाशित


वृत्त महोदय,



मी सौ. गंगुबाई पुंडलिकराव दामधर रा.जामोद ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा, महाराष्ट्र राज्य येथील रहिवाशी असून ग्राम पंचायत जामोद चे लोकनिर्वाचीत सरपंच आहे.
मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता असून भारतीय जनता पक्षा कडूनच सरपंच झाले आहे आम्ही अहोरात्र पक्ष बळकट करण्या करिता झटत आहोत, २०१४ ला जेव्हा आपण पंतप्रधान पदावर आलात तेव्हापासून आम्हा कार्यकार्तामध्ये नवचेतना आलेली आहे. आपल्या व पक्षाच्या विरोधात आम्ही काहीही सहन करीत नाही,

आम्ही सदैव पक्ष व आपल्या बाबत जनतेमध्ये सकारात्मक दृष्टीकोन करिता प्रयत्नरत असतो. परंतु दि. १४ मे च्या खत दर वाढी च्या वृत्ता पासून शेतकर्यांमध्ये कमालीचा रोष आहे आमचा भाग हा शेती बहु ल असून ८०% जनता ही शेतीवरच अवलंबून आहे. कोरोना सारख्या महामारी मुळे कुठल्याही शेत मालाला भाव मिळेनासे झालेत, टरबूज, खरबूज, तर शेतकरी चक्क फूकट विकत आहेत. लॉक डाऊन मुळे पिक कर्ज वाटप बंद आहे लॉक डाऊन मुळे बँका बंद आहेत, शेती ची मशागत करायला शेतक-्याची सोय नाही आहे. मी ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी महिला असून शेतक-्यांचे सुखदु :ख आणि आर्थिक नियोजन करतांना होणारी ओढताण अतिशय जवळून पाहून आहे.



खतांचे दर ६०० ते ७०० रुपयांनी म्हणजेच ५०ते ५५ टक्केनी वाढले आहेत, अशी वाढ ही शेतकर्यांना मरणाच्या खाईत ढकलेल, आपण किसान सम्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान घोषित केले तेव्हा आही खूप प्रचार प्रसार केला मात्र आज सोशल मिडिया वर या योजनेची थट्टा उडविली जात आहे, एकीकडे खात्यात २००० रुपये जमा व दुसरीकडे खताची पिशवी १९०० रुपयाला अशी बोचरी टीका सर्वत्र होत आहे. सध्या कुठलीही निवडणूक नाही म्हणून हा शेतकर्यावर अन्याय होत असल्या बाबत सर्वत्र टीका होत आहे. आज च्या सारखी नाराजी शेतक-्यांमध्ये कधी ही दिसली नाही, पूर्ण आयुष्य आपल्या भारतीय जनता पक्षा सोबत एकनिष्ठ असलेले शेतकरी ही या दरवाढी मुळे कमालीचे नाराज झाले आहेत.
एवढे सर्व होत असतांना आपल्या भारतीय जनता पक्षातील एकाही नेत्याने या अवाजवी दरवाढी बाबत लक्ष वेधले नाही याचे आश्यर्य वाटत आहे. शेतकऱ्यांच्या या नाराजीचे एखाद्या मोठ्ठ या जनआंदोलनात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. तरी माझी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून खतांचे वाढलेले दर तात्काळ कमी करावे व शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावे.


आपले नम, सौ. गंगुबाई पुंडलिक दामधर लोकनियुक्त, सरपंच जामोद ता. जळगाव जामोद जि. बुलढाणा.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *